सई ताम्हणकरचं नव्या व्यवसायात पदार्पण; वाढदिनी चाहत्यांना दिलं रिटर्न गिफ्ट

सई ताम्हणकरचं नव्या व्यवसायात पदार्पण; वाढदिनी चाहत्यांना दिलं रिटर्न गिफ्ट

काही दिवसापासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट शेअर करत होती. यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची हिंट तिच्या चाहत्यांना मिळाली होती. सईने तिच्या वाढदिवसानिमित्त एका खास गोष्टीची घोषणा केली आहे. सईने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. सईने तिच्या वाढिवसानिमित्त ‘मॅडम एस’ (madame S) हा Merchandise ब्रँड लाँच केला आहे. अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच खास आहे. ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’ असा याचा अर्थ आहे .

सईने लॉन्च केला नवा ब्रँड

2024 वर्ष सईसाठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत असते. आता तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. सईने नवा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. या सगळ्याबाबत सई बोलती झाली. ब्रँड लाँच करणं, ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती. पण फॅन्सच्या मनात नुसतं राहायचं नाही तर उरायचं आहे आणि हे मी या निमित्ताने करू शकते. म्हणून कायम आपल्या फॅन्ससोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँडमुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती आणि म्हणून हा ब्रँड लाँच होतोय, असं सई म्हणाली.

‘मॅडम एस’ हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणून फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे. या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील, यात शंका नाही. मी उद्योजिका फक्त पेपरवर झाली. पण मानसिकरित्या ते काही पटत नाही. तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल. असंच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे, असंही सई ताम्हणकर हिने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

ब्रँडचं नाव कसं सुचलं?

ब्रँडचं नाव काय असावा हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राने याला छान असं माझ्या पर्सनालीटी शोभेल असं नाव सुचवलं आहे. यातून ‘मॅडम एस’ हा Merchandise ब्रँड आम्ही लाँच करतोय. क्वीन ऑफ स्यासी ट्यूडसारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या Merchandise ला मिळालं आहे आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेल, असं सई म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;