ज्या राहुल गांधींची खासदारकी केली होती रद्द, आज त्यांनीच ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी केले विराजमान

ज्या राहुल गांधींची खासदारकी केली होती रद्द, आज त्यांनीच ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी केले विराजमान

2019 च्या एका मानहाणीच्या प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधीना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मोदी सरकारने राजकीय डाव साधत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निकालाच्या अवघ्या 24 तासात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तत्परता दाखवत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी ज्या राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आज तेच राहुल गांधी बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्ची पर्यंत घेऊन गेले.

राहुल गांधी रायबरेली व वायनाड या दोन मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी जिंकून आले असून आता त्यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली आहे. बुधवारी लोकसभेत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात जास्त मतं मिळवून ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते या नात्याने राहुल गांधी व केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या खुर्चीवर विराजमान केले.

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का?’ असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णिश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवताना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सोबतच न्यायालयाने राहुल गांधींना तत्काळ जामीन मंजूर करताना शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली होती. तरीही ओम बिर्ला यांनी तत्काळ कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;