राजस्थानला सोन्याचे दिवस खाणीच्या परवान्यासाठी पाच कंपन्या स्पर्धेत

राजस्थानला सोन्याचे दिवस खाणीच्या परवान्यासाठी पाच कंपन्या स्पर्धेत

राजस्थानातील बान्सवाडा येथे सोन्याची खाण सापडली आहे. या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासंबंधीची लिलाव प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. यामुळे आगामी काळात देशात 25 टक्के सोन्याचा पुरवठा होऊ शकतो. राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखली जाईल. लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा हे वाटप करण्यात आले.

सोन्याच्या खाणीचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी दोन बडय़ा कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. परंतु मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला परवाना मिळाला आहे. तर इतर ब्लॉक कांकरिया गारा गोल्डच्या कंपोझिट परवान्यासाठी पाच कंपन्या स्पर्धेत आहेत. यात मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नॅच्युरल रिसोर्सेस लिमिटेड, रतलामची ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंग लिमिटेड, उदयपूरची हिंदुस्थान झिंक आणि कानपूरची जेके सिमेंट लिमिटेड या पाच कंपन्यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;