45 हजारांचं वीज बिल पाहून ग्राहकाला बसला शॉक; आता मेणबत्त्या वापराव्या का?

45 हजारांचं वीज बिल पाहून ग्राहकाला बसला शॉक; आता मेणबत्त्या वापराव्या का?

मुंबईसह देशातील अनेक शहरात भरमसाट वीज बिल ग्राहकांना येत आहे. त्यामुळे वीज बिल केंद्रात ग्राहकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या दिसतात. गुरुग्राममधील एका व्यक्तीला दोन महिन्याचे वीज बिल 45 हजार रुपये आले आहे. या वीज बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत वीज ग्राहकाने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. जसवीर सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दोन महिन्यांचे वीज बिल पेटीएमद्वारे भरले आहे. तसेच या वीज बिलावर तुम्ही 45,491 रुपये रक्कम पाहू शकता. त्यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, वीज बिल भरले आहे. किंमत पाहता आता मेणबत्त्यांचा वापर करण्याची गरज आहे, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे, जी सध्या अनेकांना विचार करायला भाग पाडते आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @jasveer10 या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून युजर्स विविध गोष्टींवर चर्चा करताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी वीज खर्चाबाबत स्वतःचे अनुभव शेअर केले, तर काही जणांनी जसवीर सिंग यांच्या वीज बिलामागील संभाव्य कारणांचा अंदाज लावला. तसेच कमेंट सेक्शनमध्ये विविध क्षेत्रांमधील विजेच्या विविध खर्चांवर आणि अनेकांना त्यांच्या उपयोगिता खर्चाचे व्यवस्थापन करताना येणाऱया आव्हानांवरही प्रकाश टाकला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;