हिंदुस्थानी लष्करामध्ये लवकरच ‘रोबोटिक डॉग’; शत्रूंना आता धडकी भरणार!

हिंदुस्थानी लष्करामध्ये लवकरच ‘रोबोटिक डॉग’; शत्रूंना आता धडकी भरणार!

शत्रूला धडकी भरवणारे ‘रोबोटिक डॉग’ लवकरच हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हिंदुस्थानी सैन्यदल रोबोटिक डॉग ‘म्यूल’ म्हणजे मल्टीयुटिलिटी लेग्ड इक्विपमेंटचा विचार करत आहे. सध्या तरी शत्रूवर देखरेख ठेवणे किंवा हलकं वजन वाहून नेणे, या कामांसाठी ‘म्यूल’ ना सज्ज केले जाईल. मात्र येत्या काळात ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानी लष्करात अद्ययावत मिलिट्री टेव्नोलॉजी येत आहे. गेल्यावर्षी जम्मू येथे झालेल्या ‘नॉर्थ टेक सिंपोसियम 2023’ मध्ये खास हिंदुस्थानी लष्करासाठी बनवण्यात आलेल्या रोबोटिक डॉगची चर्चा रंगली होती. युद्ध आणि शत्रूवर पाळत ठेवण्यासाठी त्याला डिझाईन करण्यात आले होते. हे ‘म्यूल’ केवळ बर्फात किंवा डोंगराळ भागातच नव्हे तर अतिरेकी दडलेले असतील अशा अरुंद, अंधाऱया जागीही जाऊ शकतात. दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत, त्याचा ठावठिकाणा मिळवू शकतात.

– ‘रोबोटिक डॉग’ मध्ये देखरेखीसाठी थर्मल कॅमेरा आणि अन्य सेन्सर आहेत. त्यासोबत लहान शस्त्रsही असतील. सीमेवर तैनात जवानांपर्यंत लहानसहान सामान पोचवण्याचे कामही डॉग करतील. याआधी हिंदुस्थानने राजस्थानच्या पोखरण येथील सराव शिबिरात रोबोटिक डॉग म्यूलचे प्रदर्शन केले होते.

10 कि.मी.वरून नियंत्रण
12 मार्च 2024 रोजी हिंदुस्थानी सैन्याने राजस्थान येथील पोखरणमध्ये झालेल्या युद्ध अभ्यास शिबीरात ‘म्यूल’ची (मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट) झलक दाखवली होती. थर्मल कॅमेरा आणि सेन्सर असलेले ‘म्यूल’ ओबडधोबड जमीन, उंच शिडी, 45 अंशीय पर्वतीय भाग यावर चढू शकतो. 10 किमी अंतरावरून नियंत्रण करू शकतो. रोबोटिक म्यूलला चार पाय आहेत. त्याचे वजन 51 किलो आणि लांबी 27 इंच आहे. हा रोबोट सवातीन तास चालू शकतो. एका तासात रिचार्ज होऊन दहा तास काम करू शकतो. छोटय़ा अंतरासाठी वायफायचा वापर करू शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;