आरक्षणाबाबत सामंजस्याने निर्णय घेतला गेला तर आमची साथ
आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहेत. सामंजस्याने याप्रश्नी निर्णय झाला तर सरकारला आमची साथ राहील. कारण मराठा असो, ओबीसी असो व अन्य घटक असो, त्यांच्यात दुही असणे राज्याच्या हिताचे नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे, तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आरक्षणाबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्याची टिप्पणी केली गेली. त्यावरून शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
योगदान पाहूनच आमदारांना परत घेण्याचा निर्णय
अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्या संपका&त असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ती खरी असेल तर त्या आमदारांना पुन्हा पक्षात घेणार का, असा सवाल यावेळी माध्यमांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर संबंधित आमदाराचे पक्षासाठी योगदान आणि स्वगृही परतण्यासाठी त्याने घेतलेली भूमिका याचा विचार करून सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
सूर्यकांता पाटील पुन्हा राष्ट्रवादीत
माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List