आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश; रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात, मनसुबे उधळले, मिंधे सरकारला काढावी लागली ऑर्डर

आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश; रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात, मनसुबे उधळले, मिंधे सरकारला काढावी लागली ऑर्डर

>> देवेंद्र भगत

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेवर आता मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेसकोर्सची मोकळी जागा ‘मिंधे’ सरकारकडून कंत्राटदार मित्र-बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. त्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने अखेर ही जागा पालिकेला देण्यासाठी मंजुरी दिली आहे.

रेसकोर्स मिंधेंच्या बिल्डर मित्रांच्या घशात घालण्यासाठी ‘आरडब्ल्यूआयटी’च्या सदस्यांवर दबाव आणला जात होता. शिवाय तबेले बनवण्यासाठी पालिका मुंबईकरांचे 100 कोटी देणार होती. मिंध्यांच्या बिल्डर मित्राला अतिरिक्त एफएसआय देण्याचा डाव होता. हा डाव शिकसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उघड केला.

असे आहे प्रकरण

दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण 211 एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 साली भाडे करारावर देण्यात आली. हा भाडे करार 2013मध्ये संपुष्टात आला.

यानंतर करार वाढवला नसल्याने ही मुदत संपल्यानंतर या जागेपैकी 120 एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर उर्वरित 91 एकर जागा आरडब्ल्यूआयटीसीला भाडेपट्टय़ाने देण्यात येणार आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या काही सदस्यांना धमकावून, दबाव आणून महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्यासाठी हा घोटाळा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उघड केल्याने सरकार हादरले होते. सरकारच्या या कारस्थानाविरोधात मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता.

एकूण 300 एकरचे ग्राऊंड मिळणार

पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात तब्बल 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणीदेखील गार्डनसाठी अद्ययाकत सुकिधा निर्माण केल्या जाणार आहेत.

डॉ. ऍनी बेझंट रोड येथून 25 मीटर रुंदीचा अंडरग्राऊंड मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग केकळ नागरिकांना ये-जा करण्यासाठी असेल. या मार्गावर वाहनांना प्रवेशास मनाई असणार आहे.

त्यामुळे रेसकोर्सकरील 120 एकरचे ‘मुंबई सेंट्रल पार्क’ आणि कोस्टल रोडवरील 175 एकर जागेकरील ग्राऊंड जोडल्यावर एकूण 300 एकरचे ग्राऊंड मिळणार आहे.

रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीमुळे याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. या जागेकर मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन, मोकळी जागा अशा सुविधा करता येतील.
– भूषण गगराणी,पालिका आयुक्त

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;