विधान परिषदेसाठी आज मतदान

विधान परिषदेसाठी आज मतदान

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघातील जागांसाठी उद्या मतदान होणार असून लोकसभेनंतर पुन्हा महायुतीला धूळ चारण्यासाठी  महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.

मुंबई पदवीधरमधून शिवसेना नेते ऍड. अनिल परब, मुंबई शिक्षकमधून ज. मो. अभ्यंकर, नाशिक शिक्षकमधून संदीप गुळवे तर कोकण पदवीधरमधून काँग्रेसचे रमेश कीर लढत असून राज्यातील सुशिक्षित मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत या चार जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 1 जुलैला होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. सलग पाच वेळा शिवसेनेने ती जागा जिंकली आहे. यावेळी शिवसेनेकडून अनिल परब रिंगणात आहेत तर त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाने किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर मतदारांमधून परब यांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याने भाजपची तंतरली आहे. त्यामुळेच भाजपने पदवीधर मतदार यादीमधून 12 हजार नावे बाद ठरवण्याचे कारस्थान केले. मात्र त्यानंतरही परब यांचा जोर कायम असल्याने किरण शेलार यांची गर्भगळीत झाल्यासारखी अवस्था बनली आहे. मुंबईतील 1 लाख 20 हजार 673 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

पेन, मोबाईल नेऊ नका

मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणि पेन नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदारांनी आपल्यासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन जाण्यासही विसरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

पसंतीक्रम महत्त्वाचा

मतदाराची ओळख पटवल्यानंतर निवडणूक अधिकारी विशिष्ट प्रकारची घडी घालून मतपत्रिका देतील. मतदान कक्षात गेल्यानंतर ती घडी उघडून त्यावरील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर मतदारांना पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. पसंतीच्या उमेदवारासमोर ‘1’ असा आकडा लिहावा लागेल.

बहुरंगी लढतीतही शिवसेनेचे पारडे जड

मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेचे ज. मो. अभ्यंकर, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे, मिंधे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे असे पाच प्रमुख उमेदवार आहेत. पण त्यामध्ये शिवसेनेच्या अभ्यंकर यांचेच पारडे जड आहे. 15 हजार 839 मतदार या मतदारसंघात मतदान करणार आहेत.

नाशिक, कोकणमध्येही रंगतदार लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघातून 21 उमेदवार रिंगणात आहेत पण खरी लढत शिवसेनेचे संदीप गुळवे, मिंधे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे. या मतदारसंघात मिंधे गटाने शिक्षकांना पैसे वाटल्याचे व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर मतदारांमध्ये संताप आहे. त्याचा फायदा गुळवे यांना होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होत आहे. डावखरे हे तिस्रयांदा निवडणूक लढवत असले तरी लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या कामगिरीचे पाठबळ कीर यांना विजयश्रीकडे नेणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;