नीट, यूजीसी पेपरफुटीनंतर एआयवर आधारित सिस्टीम; यूपीएससी परीक्षेत होणार ‘चेहरेपट्टी’!

नीट, यूजीसी पेपरफुटीनंतर एआयवर आधारित सिस्टीम; यूपीएससी परीक्षेत होणार ‘चेहरेपट्टी’!

देशात नीट, यूजीसी  पेपरफुटीनंतर यूपीएससी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. यूपीएससीने सात नव्या अटी लागू केल्या आहेत.  यूपीएससीच्या परीक्षांवेळी यापुढे परीक्षार्थ्यांच्या चेहरेपट्टीची ओळख आणि एआयवर आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे.

यूपीएससीने अनुभवी सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाकडून निविदा मागविल्या आहेत. डिजिटल फिंगरप्रिंट कॅप्चरिंग, उमेदवारांच्या चेहरेपट्टीची ओळख तसेच ई-प्रवेशाची क्यूआर कोड स्कॅनिंग, लाईव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारित सीसीटीव्ही वॉच ठेवणे यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यूपीएससी परीक्षेवेळी आधारवर आधारित फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि चेहऱ्याच्या ओळखीसाठी यूपीएससीद्वारे दिलेला डाटा यांचा उपयोग केला जाणार आहे.

यूपीएससी दरवर्षी 14  प्रमुख परीक्षांचे आयोजन करते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) च्या अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रतिष्ठत नागरी सेवा परीक्षा (सीएसई) यांचा समावेश आहे. याशिवाय, केंद्र सरकारमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’ पदांवर नियुक्तीसाठी अनेक भरती परीक्षा आणि मुलाखतीदेखील आयोगाद्वारे घेतल्या जातात.

गैरप्रकार रोखण्यासाठी यूपीएससीची तयारी

वेब सर्व्हरच्या माध्यमातून रिअल टाईम अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम

परीक्षेचे लॉईव्ह रेकार्ंडग, 24 उमेदवारांसाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा

परीक्षा केंद्राला इन-आऊट गेट असणे

परीक्षा निरीक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;