लोकसभा निवडणुकीत दणका बसताच मिंधे सरकार ताळय़ावर

लोकसभा निवडणुकीत दणका बसताच मिंधे सरकार ताळय़ावर

सिबिलची जाचक अट लावून बँकांकडून शेतकऱयांची पीककर्ज देताना अडवणूक केली जाते. लोकसभा निवडणुकीत त्याचा चांगलाच फटका मिंधे सरकारला बसला. त्यामुळे ताळय़ावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिबिलची सक्ती करणाऱया बँकांवर एफआयआर नोंदवण्यात येईल, असा इशारा आज दिला.

राज्यस्तरीय बँकर्स समितीची 163 वी बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱयांना पीक कर्ज देताना बँका सिबिलची सक्ती करत असल्याने शेतकऱयांना कर्ज मिळण्यात अडचण येते. परिणामी शेतकऱयांमध्ये प्रचंड निराशा असल्याचा मुद्दा यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर फडणवीस म्हणाले, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ‘सिबिल’ची अट लावली जाणार नाही, असे दरवेळी सांगितले जाते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. यापुढे ‘सिबिल’मुळे कर्ज नाकारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बँकांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. बँका ‘सिबिल’ची अट टाकत असतील तर आम्ही त्यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल करू. हे तुम्ही तुमच्या सर्व शाखांना कळवा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;