‘जय श्रीराम’च्या घोषणेसाठी आग्रह, मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव; पोलीस संरक्षण देण्याचे आदेश

‘जय श्रीराम’च्या घोषणेसाठी आग्रह, मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव;  पोलीस संरक्षण देण्याचे आदेश

मडगाव एक्स्प्रेसने कणकवली येथून मुंबईत येताना एका मुस्लिम कुटुंबाला जय श्रीरामच्या घोषणा देण्याचा आग्रह काही तरुणांनी केला. या घटनेने भयभीत झालेल्या या कुटुंबाने पोलीस संरक्षणासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

जास्मीन शेख व आसीफ अहमद शेख यांनी ही याचिका केली आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. शेख कुटुंबासोबत घडलेली घटना वेदनादायी आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करा व आरोपींविरोधात गुन्हा नोंदवा, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.

काय आहे प्रकरण

चेंबूर येथे शेख कुटुंब वास्तव्यास आहे. जानेवारी 2024 मध्ये हे कुटुंब धार्मिक उत्सवासाठी कणकवली येथे गेले होते. 19 जानेवारी 2024 रोजी मडगाव एक्स्प्रेसने मुंबईला परतत होते. या प्रवासात ही घटना घडली. 30 ते 40 कॉलेज तरुणांचा ग्रुप त्यांच्या डब्यात होता. हा ग्रुप मोठमोठय़ाने गाणी म्हणत होता. आसीफ यांच्यासोबत दोन लहान मुली होत्या. माझ्या मुलींना त्रास होतोय, जोरजोरात गाणी म्हणू नका, अशी विनंती आसीफ यांनी तरुणांना केली. त्यातील एक तरुण पुढे आला व त्याने आसीफ यांना जात विचारली. आसीफ यांनी मुस्लिम असल्याचे सांगताच तरुणांनी त्यांच्यावर जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला. आसीफ यांनी जय श्रीराम म्हणण्यास नकार दिला. तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. शेख कुटुंबाने याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी सहा तरुण व एका तरुणीला ताब्यात घेतले. त्यातील एक जण पळून गेला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांनी उलट आम्हालाच धमकावले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

मुलीच्या तोंडावर चहा फेकला, पाकिस्तानात जाण्याची धमकी

एका तरुणाने माझ्या मुलीच्या तोंडावर चहा फेकला. जय श्रीराम म्हणा अन्यथा पाकिस्तानला निघून जा, अशी धमकी या तरुणांनी दिली होती. राजकीय दबावापोटी याचा तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास अन्य पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

नितेश राणेंनी पोलिसांसमोर धमकावले

नितेश राणेंच्या सांगण्यावरून हा तपास कणकवली येथे वर्ग करण्यात आला. आम्हाला धमकावण्यासाठी काही जण आले होते. आम्ही नितेश राणेंची माणसे आहोत. तुम्ही नितेश राणे यांच्या विरोधात काही केलात तर तुम्हाला ठार मारू, अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली. आम्ही पोलिसांना पह्न केला. पोलीस आम्हाला कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे 200 ते 300 जणांचा जमाव होता. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. तक्रार मागे घेण्यासाठी नितेश राणेंनी पोलिसांसमोर धमकावले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;