उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील पदावरील नियुक्तीला आव्हान
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांची मिंधे सरकारने विशेष सरकारी वकीलपदी केलेली नेमणूक वादात सापडली आहे. त्यांच्या नियुक्तीला हत्या प्रकरणातील आरोपी विजय पालांडेने आव्हान दिले आहे. माझ्याविरोधातील खटल्यात अॅड. निकम यांची दुष्ट हेतूने केलेली नेमणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी पालांडेने केली आहे. अॅड. निकम हे निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या गोटात सक्रिय झाले होते. ते आता न्यायालयात भाजपच्या अजेंडय़ासाठी काम करतील, जनतेच्या नजरेत प्रतिमा निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचा निष्पक्ष खटल्याच्या तत्त्वाला तसेच आरोपीच्या मूलभूत हक्कांना बसेल, असा दावा विजय पालांडेने केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List