माटुंग्यात पुलाखालील उद्यानात मोफत खुले ग्रंथालय
मुंबईत आता उद्यानात निवांत बसून मोफत पुस्तके वाचण्याचा आनंद रहिवासी आणि विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. महापालिकेने माटुंगा येथे नानालाल मेहता पुलाखालील मोकळय़ा जागेत मोफत खुले ग्रंथालय सुरू केले आहे. एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी गबुला फाऊंडेशन, इनरव्हील संस्था यांचे प्रतिनिधी, रहिवासी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या वतीने एफ-उत्तर विभागाच्या वतीने 2016 मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान हे नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List