निवडणुकीतील पराभवाचे खापर सरकारने फोडले अधिकाऱ्यांवर, खरीप हंगामाच्या बैठकीत मुख्यमंत्री संतापले

निवडणुकीतील पराभवाचे खापर सरकारने फोडले अधिकाऱ्यांवर, खरीप हंगामाच्या बैठकीत मुख्यमंत्री संतापले

लोकसभा निवडणुकीतील शेतकऱयांची नाराजी महायुती सरकारला भोवली आणि त्याचा परिणाम महायुतीच्या पराभवात झाला. पण या पराभवाचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिऱयांवर फोडले. शेतकऱयांसाठी आम्ही योजना करतो, पण तुम्ही त्याची अंमलबजावणी नीट करीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभवाचे खापर जिल्हाधिकाऱयांवर फोडल्याचे समजते.

खरीप हंगामाची बैठक आज सहय़ाद्री अतिथीगृहावर झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भरपाई 30 जूनपर्यंत द्या

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसानभरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱयांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱयांनी शेतकऱयांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱया विव्रेत्यांबरोबरच पंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना या वेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.

यंदा सरासरीइतका पाऊस

भारतीय हवामान विभागाने संभाव्य पर्जन्यमानाचे सादरीकरण केले. जून महिन्यात अल निनाचा प्रभाव राहिला असला तरी सरासरीइतका पाऊस होईल, असे ते म्हणाले. तसेच जुलैमध्येही सरासरीइतका पाऊस पडेल, असेही ते म्हणाले.

कापसाचे क्षेत्र घटणार

मागील वर्षी अपुऱया पर्जन्यमानाचा मोठा फटका अन्नधान्य उपत्पादनाला बसल्याचे कृषी विभागाने बैठकीत सादर केले. मागील खरीप हंगामात खरीप ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल 61 टक्क्यांची घट झाली असून उत्पादनात 67 तर उत्पादकतेत 15 टक्क्यांची घट झाली आहे. प्रचंड गाजावाजा करत तृणधान्य महोत्सव साजरा करूनही बाजरीच्या क्षेत्रात 45 टक्के घट झाली असून उत्पादनात 66 घट झाली आहे. एकूण तृणधान्यांच्या उत्पादनात 16 टक्के घट झाली असून क्षेत्र 12 टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या लहरी हवामानाचा फटका सोयाबीन आणि कापसाला बसला असून सोयाबीनचे क्षेत्र जैसे थे राहील तर कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;