शिवाजीनगरच्या पार्टीत एमडी ड्रग्जचा वापर, दोघांना अटक; मुंबईहून पुण्यात आले ड्रग्ज

शिवाजीनगरच्या पार्टीत एमडी ड्रग्जचा वापर, दोघांना अटक; मुंबईहून पुण्यात आले ड्रग्ज

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड लिजर लाऊंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत एम.डी. ड्रग्जचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एकाला मुंबईतील गोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानेच मुंबईहून पार्टीसाठी पुण्यात हे ड्रग्ज आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या ठिकाणी ड्रग्ज पार्टी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

नितीन ठोंबरे (34, रा. गोरेगाव, मुंबई) व करण मिश्रा (24, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एल थ्री बारमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. या पार्टीत तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधीत ठिकाणी कारवाई करून सात ते आठ जणांना अटक केली. मात्र ड्रग्ज घेणारे तरुण पसार होते. या बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. कामठे याने सोशल मिडीयात पार्टीची जाहिरात प्रसारित केली होती. पार्टीसाठी येणाऱयांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. पार्टीत सामील झालेल्या काही जणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. मात्र रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. या दरम्यान तांत्रिक तपासावरून पोलिसांनी पार्टीत ड्रग्ज घेणाऱया दोघांना मंगळवारी अटक केली. ठोंबरे याला गोरेगाव तर मिश्राला मुंढव्यातून अटक करण्यात आली. नितीन हा आर्किटेक म्हणून नोकरी करतो. तर करण हा एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ड्रग्ज घेतले असल्याची कबुली दिली आहे.

ड्रग्ज पार्टीचे मुंबई कनेक्शन

आर्किटेक्ट असलेला नितीन ठोंबरे मूळचा मुंबईतील गोरेगावचा आहे. तो पार्टीच्या दिवशी मुंबईतून पुण्यात आला. त्याने मुंबईवरून येत असतानाच मेफेड्रोन (एमडी) हे ड्रग्ज आणले होते. त्यानंतर त्यांनी पार्टीत ड्रग्ज सेवन केले. तत्पूर्वी त्यांनी दुसऱया एका ठिकाणी पार्टी केली होती. ठोंबरेला मुंबईतून पुणे पोलिसांनी पकडल्यानंतरदेखील त्याच्याकडे 5 ग्रॅम एमडी आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एक्साईजचे दोन अधिकारी निलंबित

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील बेकायदा पार्टी तसेच ड्रग्ज सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तर या इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हॉटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. रचनेत बदल करून बेकायदा व्यवसाय करत असल्याने याचा परवानादेखील रद्द केला आहे. तसेच कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील दोघा अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;