‘नीट’ प्रकरणात शिक्षक संजय जाधव यांनाही अटक; 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

‘नीट’ प्रकरणात शिक्षक संजय जाधव यांनाही अटक; 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

देशात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील शिक्षक संजय तुकाराम जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 2 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. देशात गाजणारे नीट परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण लातूरपर्यंत पोहचले. लातूर येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परीक्षा पेपर फुटी प्रकरणी चौघाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अगोदर जलील उमरखाँ पठाण (कातपूर जिल्हा परिषद प्रशाला शिक्षक) यास अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती.

या प्रकरणातील चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवासी व सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव यांनाही अटक करण्यात आली होती. मंगळवारी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जाधव यास देखील 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात लातूर पोलिसांनी जलील उमरखाँ पठाण, संजय तुकाराम जाधव, ईरण्णा मष्णाजी कोंगलवार (आयटीआय शिक्षक उमरगा) व गंगाधर रा. दिल्ली अशा चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जलील पठाण आणि संजय जाधव यांना अटक केली. या प्रकरणात उर्वरित दोन जणांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;