मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र!ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र!ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांची मागणी नेमकी काय आहे हेच कळत नाही. प्रत्येक आंदोलनात त्यांची वेगळी मागणी असते. ज्या मागण्या कधीच मान्य होऊ शकत नाहीत त्या मागण्या जरांगे करतात. त्यांच्या आंदोलनामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. जालना येथे पत्रकारांशी बोलताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी डॉ. रमेश तारख यांना काळे फासण्याच्या घटनेचा निषेध केला. ही झुंडशाही असल्याचे ते म्हणाले. उपोषणामुळे गावकर्‍यांना त्रास होणे साहजिक आहे. आंदोलन झाली पाहिजेत पण रीतसर मार्गाने. आंदोलनामुळे माणसाचे जगणे मुश्कील होईल असे घडू ये, असा सल्लाही लक्ष्मण हाके यांनी दिला.

बुद्धिभेद करू नका
धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे बोलले जात आहे. धनगर समाजाला देण्यात आलेले साडेतीन टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गाच्या बाहेरचे आहे का? धनगर समाज ओबीसीमध्ये येत नाही का? असा सवाल करून या विषयावरून उगाच बुद्धिभेद करण्यात येत असल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. मनोज जरांगे यांचा आरक्षणावर कवडीचाही अभ्यास नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;