घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी मोठा निर्णय; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खलीद निलंबित
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (डीजीपी, मानवाधिकार संरक्षण) कैसर खलीद यांना निलंबित करण्यात आले आहे. खलिद यांच्या पत्नीच्या खात्यात होर्ड़िंगची परवानगी असलेल्या कंपनीने लाखो रुपये भरल्याचा आरोप आहे. यातून खलिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतच्या निर्णयाचे पत्र गृह विभागाकडून काढण्यात आले आहे.
घाटकोपर होर्डिंगचे कंत्राट मिळविल्यात फेरफार आणि आर्थिक घोटाळा झाल्याचे तपासात उघड झाले आहे. 13 मे रोजी घाटकोपर येथे रेल्वेच्या भागात असलेले मोठे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर परवानगीपेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग लावणे, या होर्डिंगची परवानगी देणे यासारखे मुद्दे चर्चेत आले होते. या प्रकरणाच्या तपासात कैसर यांच्या पत्नीच्या खात्यात होर्डिंगची परवानगी मिळालेल्या कंपनीने लाखो रुपये भरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गृह विभागाने कारवाई करत कैसर खलीद यांचे निलंबन केले आहे. आर्थिक फायद्यासाठी नियमांचे उल्लंघन करून अवाढव्य होर्डिंग उभारल्याचे तपासात उघड झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List