शिवसैनिकाचा प्रामाणिकपणा पर्ससह तीन लाखाचा ऐवज परत

शिवसैनिकाचा प्रामाणिकपणा पर्ससह तीन लाखाचा ऐवज परत

हरवलेली वस्तू पुन्हा मिळणे फार कठिण असते. मात्र एका शिवसैनिकाच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला तिची हरवलेली पर्स पुन्हा सापडली आहे. या पर्समध्ये दोन अॅप्पल कंपनीचे मोबाईल व पैसे असा एकूण तीन लाख रुपयाचा ऐवज होता.

कोपरगाव येथील गरिमानगरी परिसरात बाळासाहेब साळुंके कामानिमित्याने जात असताना रस्त्यावर एक पर्स त्यांना आढळून आली. पर्समध्ये दोन अॅप्पल कंपनीचे मोबाईल व पैसे असा एकूण तीन लाख रुपयाचा ऐवज त्यांना सापडला. पर्स मधील असलेल्या मोबाईलवर आलेल्या फोनमुळे त्यांच्या लक्षात आले की ही पर्स सविता विजय डिबरे यांची आहे . क्षणाचाही विलंब न करता बाळासाहेब साळुंके यांनी घरी जात हे मोबाईल व पैसे परत केले. संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्थेमध्ये सविता डिबरे या मेस चालवतात. पर्स हरवली असल्याची त्यांना दोन तासापूर्वी कल्पना होती. मात्र ती कुठे पडली याचा तपास त्यांना लागला नाही. त्यांचे पती विजय डिबरे व मुलाने गहाळ झालेल्या वस्तूची कल्पना रितसर पोलीस स्टेशनला देण्याचे ठरवले होते. मात्र डिबरे यांनी मोबाईलवर फोन केल्यानंतर बाळासाहेब साळुंके यांनी फोन उचलत तुमचे सर्व सामान पैसे व मोबाईल मला सापडलेले आहे. तुमच्या घराचा पत्ता द्या. मी तिथे घेऊन येतो असे सांगितले. आणि अगदी पंधरा मिनिटात घराचा पत्ता शोधत बाळासाहेब साळुंके यांनी जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज त्यांना परत केला.

आजकाल चैनीच्या जमान्यात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे मूर्तिमंत उदाहरण डिबरे यांच्या कुटुंबाला पाहायला मिळाले. प्रदीप डिबरे, विजय डिबरे , प्रकाश खडांगळे यांनी बाळासाहेब साळुंके यांचा सत्कार केला. आपल्या स्वतःचा लोहार व्यवसाय सांभाळत असताना देखील विविध सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सापडलेली वस्तू परत करताना साळुंके यांनी आपल्या मुलांना समवेत घेत प्रामाणिकपणा काय असतो हे दाखवण्यासाठी त्यांच्यासमोर हे सर्व साहित्य परत केले. कोपरगाव परिसरात साळुंके यांचे कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;