अभिषेक बच्चन याच्यासोबत साखरपुडा, तरीही होऊ शकली नाही बच्चन कुटुंबाची सून करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय…

अभिषेक बच्चन याच्यासोबत साखरपुडा, तरीही होऊ शकली नाही बच्चन कुटुंबाची सून करिश्मा कपूर, ऐश्वर्या राय…

अभिषेक बच्चन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. चित्रपटांसोबत अभिषेक बच्चन याचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय हिच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे अत्यंत खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा झाला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांची एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर काही वर्षे अभिषेक बच्चन हा करिश्मा कपूर हिला डेट करत होता. पाच वर्ष यांनी एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ज्यावेळी करिश्मा कपूर ही अभिषेक बच्चन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्यावेळी ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती.

करिश्मा कपूर हिने आपल्या करिअरची सुरूवात 16 व्या वर्षी केली. विशेष म्हणजे करिश्मा कपूर हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. एका मागून एक हिट चित्रपट देताना करिश्मा कपूर दिसली. ज्यावेळी ती अभिषेक बच्चन याला ती डेट करत होती, त्यावेळी अभिषेक बच्चन याने चित्रपटांमध्ये काम करण्यासही सुरूवात केली नव्हती.

हेच नाही तर ज्यावेळी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला, त्यावेळी त्याने पहिलाच चित्रपट केला होता. साखरपुडा होऊनही अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही. असे सांगितले जाते की, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न तोडण्यात दोघांच्याही आईचा हात होता. सुरूवातीच्या काळात बच्चन आणि कपूर दोन्ही कुटुंबिय आनंदात होते.

जया बच्चन यांची अशी अट होती की, लग्नानंतर करिश्मा कपूर हिने चित्रपटांमध्ये काम करू नये. करिश्मा कपूरची आई बबीता कपूर यांना हे मान्य नव्हते. त्यासोबतच त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. यामुळेही बबीता कपूर यांचा लग्नाला विरोध होता. अभिषेक बच्चन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, याबद्दलही करिश्माची आई संभ्रमात होती.

मुळात म्हणजे करिश्मा कपूर हिच्या आईची अजिबात इच्छा नव्हती की, लग्नानंतर तिच्या मुलीला स्ट्रगलर करण्याची वेळ यावी. शेवटी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा तुटला. त्यानंतर करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यासोबत लग्न केले. मात्र, करिश्मा कपूर हिने लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;