पाथर्डी शहरात भांड्याच्या दुकानाला आग, आगीचे कारण अस्पष्ट
पाथर्डी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कालिका भांडी भंडार या भांड्याच्या दुकानाला सोमवारी रात्री अचानकपणे आग लागून दुकानातील भांडी,फर्निचर हे आगीत जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
सोमवारी रात्री आठ वाजता दुकान मालक सुनील पाथरकर हे दुकान बंद करून घरी गेले मात्र त्या नंतर रात्री नऊ च्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे काहींच्या लक्षात आले तर त्या नंतर दुकानात मोठा स्फोट होऊन दुकानाचे शटर दुकानापासून जवळपास पंधरा फूट लांब अंतरावर जाऊन पडले. स्फोटामुळे या दुकानाच्या लगत असलेला परिसर हादरला. ही आग दुकानाच्या वरच्या मजल्या पर्यंत पसरत गेली. या वेळी परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग वीजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात न आल्याने घटनास्थळी पालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले. पथक प्रमुख अशोक डोमकावळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही आग वीजवली. ही आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
आग वीजवण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलिस नाईक अमोल आव्हाड,अभयसिंह लबडे, कृष्णा बडे,एन.बी. गुंड,सोमनाथ घुगे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,प्रशांत शेळके, नासिर शेख, देवा पवार,जुनेद पठाण,संजय भागवत,अक्रम आतार,अनिकेत निनगुनकर,रशीद फारुख शेख,शाहरुख पिंजारी,नारायण लांडे, पंकज कोठांबे,अतुल उर्शिळे, इमरान चौधरी, शोएब शेख ,इरफान बेग, हुजेर आतार, अनिल बडदे यांनी आग वीजवण्यासाठी प्रयत्न केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List