धो धो कोसळणाऱ्या पावसातूनही आंजर्ले कड्यावरच्या गणपती दर्शनासाठी भक्तांची गर्दी

धो धो कोसळणाऱ्या पावसातूनही आंजर्ले कड्यावरच्या गणपती दर्शनासाठी भक्तांची गर्दी

धो धो मुसळधार कोसळणा-या पावसातूनही गणेशभक्तांनी आंजर्ले येथील कडयावरच्या गणपती मंदिरात मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी मोठीच गर्दी केली होती

गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असलेली अंगारक संकष्ट चतुर्थी ही 25 जून रोजी मंगळवारी होती. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी लोकभावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजाअर्चा करतात आणि उपवास धरून हे व्रत करतात.

दापोली तालूक्यातील आंजर्ले गावातील कडयावरचा गणपती म्हणून सुप्रसिध्द असे देवस्थान आहे. अषा या गणपती मंदिरात तशी कायमच दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. त्यात मंगळवारी 25 जून रोजी आलेल्या अंगारक संकष्ट चतुर्थीला आंजर्लेतील कडयावरच्या श्री गणपती मंदिरात गणपती दर्शनासाठी धो धो कोसळणाऱ्या पावसातूनही विविध भागातून दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्त गणांनी मोठीच गर्दी केली होती. येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तगण भाविकांना कडयावरील श्रीगणपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या मदतीने मनाजोगे दर्शन घेता आले.

कडयावरील गणपती मंदिर देवस्थानच्या गावाचे मुळ नाव अजरालय असे होते. सध्या आंजर्ले हेच नाव प्रचलित आहे. त्याच आंजर्ल्यातील एका टेकडीवर श्री गणपती विराजमान आहेत. त्याला सारेजन कडयावरचा गणपती असेही म्हणतात या कडयावरच्या गणपतीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, आंजर्ले येथील समुद्र किनारा अवाढव्य व विस्र्तीण होता. किना-यावर दोन मंदिरे होती एक श्री सिध्दी विनायकाचे तर दुसरे आंजर्लेश्वर म्हणजे श्री.शंकराचे कालांतराने समुद्राची वाढ झाली. तशी ही दोन्ही मंदिरे पाण्याखाली जावू लागली मंदिरे समुद्रात जाताच श्री सिध्दी विनायकाने किना-यासमोरच्या कडयावर जावून मुक्काम केला. या गणपती मंदिराचा ईतिहास बाराव्या शतकापर्यत मागे जात असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. अशा या विश्वात्मक विश्वाधर मुलाधरस्थित ओंमकार स्वरूप श्री गणेशाचे मुक्त दर्शन सर्वांना घेता येते. तसे आज अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविकांनी आंजर्लेत येवून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;