नगरच्या रेल्वे स्थानकातून बाळाचे अपहरण; सुप्यात धागेदोरे सापडले

नगरच्या रेल्वे स्थानकातून बाळाचे अपहरण; सुप्यात धागेदोरे सापडले

नगरच्या रेल्वे स्थानकातून एका 11 महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाले. या अपहरण प्रकरणी पोलिसानी तिघांना अटक केली असून बाळाची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे एक महिला व 2 पुरुष अशा तिघांनी अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 16 जून रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास नगर रेल्वे स्थानक मेनगेट परिसरातील एटीएम कॅबीनच्या समोरील लिंबाच्या झाडाखालून तक्रारदार अमृता आकाश खडसे (वय 23, रा. मु. पो. तोंडगाव ता. जि. वाशिम) यांच्याजवळ एक अनोळखी महिला (वय 35 ते 40 वर्षे) आली तिने तक्रारदाराशी ओळख वाढवून त्यांच्याजवळील 11 महिन्याचे त्यांचे बाळ स्वानंद आकाश खडसे याला स्थानकाबाहेरून जेवणाकरीता वरण भात घेवून येते अशी बतावणी करून बाळास पळवून नेले होते.

अनोळखी महीला बाळासह परत आलीच नाही. त्यामुळे बाळाच्या आईने नगर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोणकर करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा केलेले आरोपी सुपा परिसरात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिताफीने संशयितांना ताब्यात घेत विचारपुस केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. या प्रकरणी अनिल अशोक जाधव (वय 41, रा. अमित मोटर्स पाठीमागे, सुपा, ता. पारनेर), नवनाथ विष्णु धोत्रे (वय 33, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), शालन अनिल जाधव (वय 38, रा. अमित मोटर्स पाठीमागे, सुपा, ता. पारनेर) यांना अटक करण्यात आली असून अपहरण केलेले बालक स्वानंद आकाश खडसे याची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;