मुसळधार पावसातही भाविकांची गणपतीपुळ्यात गर्दी, अंगारकी संकष्टी उत्साहात साजरी

मुसळधार पावसातही भाविकांची गणपतीपुळ्यात गर्दी, अंगारकी संकष्टी उत्साहात साजरी

मुसळधार पावसामध्ये आज गणपतीपुळ्यात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांचा जनसागर पहायला मिळाला. दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 80 हजार भाविकांनी दर्शन घेतले.

अंगारकी संकष्टीनिमित्ताने मंगळवारी श्रीदेव गणपतीपुळेचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले करण्यात आले. सुरुवातीला मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रीची महापुजा करण्यात आली. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. अंगारकी संकष्टीनिमित्ताने गर्दी होणार हे माहित असल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. दर्शनाच्या रांगांच्या ठिकाणी पावसापासून भाविकांचे संरक्षण व्हावे याकरीता पत्र्याची शेड उभारण्यात आली होती. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती.

पोलीस, जीवरक्षक आणि देवस्थानचे सुरक्षा रक्षक भाविकांच्या व्यवस्थेसाठी तैनात होते. सायंकाळी साडेचार वाजता श्रींच्या पालखीची ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुसळधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने भाविक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळ्यात दाखल झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;