ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा, 28 जूनला विधान भवनावर धडकणार

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा, 28 जूनला विधान भवनावर धडकणार

विविध मागण्यांसाठी ग्रामपंचात कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनच्यावतीने 28 जून रोजी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने केली. त्यावेळी शासनाकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली. मात्र त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करुन राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील, असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील 27 हजार 920 ग्रामपंचायती मधील 60 हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे, किमान वेतनाच्या अनुदानाची 19 महिन्यांची थकीत रक्कम तत्काळ मिळावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाब असलेली वसुलीची अट रद्द करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी, ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी, या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;