सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न कोणत्या धर्मानुसार? ‘ते’ फोटो व्हायरल, शत्रुघ्न सिन्हा हे जावयाला…

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न कोणत्या धर्मानुसार? ‘ते’ फोटो व्हायरल, शत्रुघ्न सिन्हा हे जावयाला…

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जून 2024 रोजी झाले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत होते. शेवटी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नाच्या वेळी संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते.

आता सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोंमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाच्या काही विधी करताना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे दिसत आहेत. एका फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हाची आई झहीर इक्बाल याला तिळक लावताना दिसत आहे.

दुसऱ्या एका फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम या झहीरच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. हे फोटो पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर एक चर्चा जोरदार रंगत आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे लग्न हे हिंदू रितीरिवाजानुसार झालंय. सोनाक्षीने लग्नाचे खास फोटोही शेअर केले होते.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सिव्हील मॅरेज केल्याचे सांगितले जाते. मात्र, व्हायरल होणारे फोटो पाहून हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करण्यात आल्याची चर्चा आहे. सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये स्पष्ट दिसत होते की, सही करताना तिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी अगोदरच स्पष्ट केले होते की, मी सोनाक्षीच्या प्रत्येक निर्णयात तिच्यासोबत असेल. सोनाक्षी जो काही निर्णय घेईल, तो योग्यच असेल. सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे सहभागी झाले होते. मात्र, ते कोणत्याही विधींमध्ये सहभागी होताना दिसले नाहीत. यामुळे अशी चर्चा आहे की, लव आणि कुश हे सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात नाराजच होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;