जखम डोक्याला मलम पायाला! मुलाच्या पायाऐवजी केली प्रायव्हेट पार्टची शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा हलगर्जीपणा
अनेकदा किचकट आणि जटील शस्त्रक्रिया काही निष्णात डॉक्टर त्यांचे कौशल्य पणाला लावत करतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळते. मात्र. काही डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णांच्या जीववर बेततो. अशीच एक घटना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. डॉक्टरांचा हा निष्काळजीपण 14 वर्षांच्या मुलाला भोवला आहे. या मुलाच्या पायऐवजी डॉक्टरांनी गुप्तांगाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रकार उघडकीस आल्याने, या घटनेबाबत सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
शहापूरमधील प्रीतम सुरेश नावाच्या एका 14 वर्षांच्या मुलाच्या पायाला जखम झाली होती. त्याला उपचारासाठी त्याच्या पालकांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याचा पायाचा एक्स रे आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्याचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर प्रीतमच्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितले. त्यासाठी प्रीतमच्या पालकांनी परवानगी दिली.
शस्त्रक्रियेची स्रव तयारी झाल्यानंतर त्याला शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी प्रीतमच्या पायाऐवजी त्याच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया केली. प्रीतमच्याआधी दोन मुलांवर त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये यूरिनरी ट्रॅक्ट शस्त्रक्रिया (गुप्तांगाशी संबंधित शस्त्रक्रिया) करण्यात आली होती. त्या दोन मुलांनंतर पायाच्या शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलेल्या प्रीतमचीही तीच शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांचा हा हलगर्जीपणा उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List