अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाकडून रद्द

अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाकडून रद्द

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने रद्द केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देताना विवेकाचा वापर केलेला नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या पीठाने राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाला दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कनिष्ठ न्यायालयाच्या पीठाने केजरीवाल यांना जामीन देताना आपल्या विवेकाचा वापर केला नाही, असे निरीक्षणही नोंदवले आहे. आम्ही दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. मात्र कनिष्ठ न्यायालयाने ईडीच्या कागदपत्रांची दखल घेतलेली नाही. कनिष्ठ न्यायालयाने पीएमएलएच्या कलम 45 मधील दुहेरी अटींवरही लक्ष दिले नाही, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

याआधी कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता. या जामिनाला दिल्ली हायकोर्टाने 25 जूनपर्यंत स्थगिती दिली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या सुनावणीवेळी हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय रद्द केला आहे. केडरीवाल यांना प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर 2 मे रोजी केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;