शिवसेनेच्या खासदारांनी घेतली मराठीतून शपथ, नागेश आष्टीकरांनी केला बाळासाहेबांचा उल्लेख

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली मराठीतून शपथ, नागेश आष्टीकरांनी केला बाळासाहेबांचा उल्लेख

लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्या अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व खासदारांनी मराठीत शपथ घेतली. दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शपथ घेताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला.

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, संजय बंडू देशमुख, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाझे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली.

लंकेंच्या शपथेची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेतली. या निवडणूकीत लंके यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुजय विखे यांनी लंके यांची इंग्रजी बोलण्यावरून खिल्ली उडवली होती. त्याला आज निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दलं.,

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;