बाहुबली फेम अभिनेत्रीला झाला हसण्याचा दुर्मिळ आजार! अनुष्का शेट्टीने स्वतः दिली माहिती
बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. अनुष्काने अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता अनुष्का एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड गायिका अलका याग्निक आपल्या दुर्मिळ आजारासंदर्भात स्वत: माहिती दिली होती. दरम्यान, आता अनुष्का शेट्टीनेदेखील नुकतंच आपल्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. अनुष्कादेखील दुर्मिळ आजाराची शिकार झाली आहे. यामुळे तिच्या शूटींगमध्ये अडथळा निर्माण होत आहे.
अनुष्का शेट्टीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान आपल्या आजाराचा खुलासा केला आहे. मला हसण्याचा आजार आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हसणे हा देखील एक आजार असू शकतो. पण माझ्या बाबतीत तसंच झालं आहे. एकदा मी हसायला लागले की 15-20 मिनिटे हसणे थांबवणे माझ्यासाठी कठीण होते. कोणताही कॉमेडी सीन पाहताना किंवा शूट करताना मी हसत हसत जमिनीवर अक्षरश: लोळते. माझ्या अशा हसण्यामुळे आम्हाला शूटींग मध्येच थांबवावे लागते. असे अनुष्काने सांगितले.
अनुष्काला झालेला हा आजार ‘स्यूडोबुलबार इफेक्ट’ म्हणजेच ‘पीबीए’ नावाचा आजार आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. या मानसिक आजारात माणूस अचानक हसायला किंवा रडायला लागतो. या आजारामुळे तिला काही गोष्टींचा सामाना करावा लागत आहे.
अनुष्का 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी’ मध्ये दिसली होती. ‘घाटी’ (तेलुगु) आणि ‘कथानर: द वाइल्ड सॉर्सर’ या आगामी मल्यालम चित्रपटात ती सध्या काम करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List