लोखंडी सांगाडा पडून एकाचा मृत्यू

लोखंडी सांगाडा पडून एकाचा मृत्यू

भरधाव वेगातील ट्रकने झाडाला धडक दिल्याने ट्रकमधील लोखंडी सांगाडा डोक्यात पडून पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रेच्या कार्टर रोड परिसरात घडली. विजय आसराणी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंद केला.

विजय आसराणी हे वांद्रे कार्टर रोड येथे राहायचे. रविवारी पहाटे विजय हे टर्नर रोड येथून कार्टर रोड येथून चालत जात होते. तेव्हा जेरपेले बंगलोसमोर भरधाव वेगातील ट्रक आला. ट्रकने झाडाला धडक दिली. धडक दिल्याने ट्रकमधील लोखंडी सांगाडा घसरून विजय यांच्या डोक्यावर पडला. डोक्यावर सांगाडा पडल्याने विजय हे जखमी झाले. या घटनेची माहिती समजताच वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी विजय यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;