निवडणूक लढवून उज्ज्वल निकम फसले! हत्या प्रकरणातील आरोपीने घेतला आक्षेप

निवडणूक लढवून उज्ज्वल निकम फसले! हत्या प्रकरणातील आरोपीने घेतला आक्षेप

लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनीच दारूण पराभव केला. आता हा पराभव उज्ज्वल निकम यांची पाठ सोडत नाहीये. अनेक हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडे याने अॅड. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात कोर्टात याचिका केली आहे.

उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला आरोपी विजय पालांडे याने कोर्टात आव्हान दिले आहे. आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे भाजपकडून निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार आणि अजेंडा बदललेला आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे.

आरोपी विजय पालांडे हा 2012 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्लीतील व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्युसर करणकुमार कक्कड यांच्या हत्येचा पालांडेवर आरोप आहे. दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;