‘बाहुबली’ फेम देवसेना गंभीर आजाराच्या विळख्यात, 15 – 20 मिनिटं अभिनेत्रीला नसते कसलीच शुद्ध

‘बाहुबली’ फेम देवसेना गंभीर आजाराच्या विळख्यात, 15 – 20  मिनिटं अभिनेत्रीला नसते कसलीच शुद्ध

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अलका याज्ञिक यांना एक दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डर (आजार) झाला आहे. न्यूरो डिसऑर्डर हा एक दुर्मिळ आजार आहे. आता अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. अनुष्का हिने ‘बाहुबली’ सिनेमात देवसेना या भूमिकेला न्याय दिला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःला असलेल्या दुर्मिळ आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अनुष्का एका दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. या आजारामध्ये अभिनेत्री मध्ये हसायला लागते. त्यानंतर अभिनेत्रीवर नियंत्रण मिळवणं फार कठीण होते. अशात सिनेमाचं शुटिंग देखील काही काळ बंद करावं लागतं. अभिनेत्रीला पुन्हा ठिक होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली, ‘मला हसण्याचा आजार आहे. तुम्हाला जाणून थक्का बसेल की, हसणं देखील एक आजार असू शकतो. माझ्या केसमध्ये हसणं आजार आहे. एकदा मी हसणं सुरु केलं तर, मला स्वतःला देखील  हसणं थांबवता येत नाही. 15 ते 20 मिनिटं मी मोठ-मोठ्याने हसते. विनोदी सीन शूट करत असताना मी हसत – हसत जमीनीवर लोळते. ज्यामुळे अनेकदा सिनेमाचं शुटिंग देखील थांबवण्यात आलं आहे…’

कसा आहे हा दुर्मिळ आजार?

अभिनेत्री आजाराबद्दल दिलेल्या माहितीनुसार, आजारचं नाव (Pseudobulbar Affect) म्हणजे PBA असं आहे. हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. या अवस्थेत व्यक्ती एकतर जोरात हसायला लागते किंवा रडायला लागते. सध्या सर्वत्र आता या आजाराची चर्चा सुरु आहे.

अनुष्का शेट्टी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. आता अभिनेत्री आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

अनुष्का शेट्टी साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अनुष्का हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बाहुबली’ सिनेमात देखील देवसेना ही भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री तिच्या आजारामुळे चर्चेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;