स्पाच्या नावाखाली सुरू होतं देहविक्रय रॅकेट, पवईत पोलिसांची कारवाई
स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पवई पोलिसांनी स्पाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अंधेरीच्या चांदिवली येथे एक स्पा सेंटर आहे. त्या स्पा सेंटरमध्ये देहविक्रय रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. पोलिसांनी बनावट ग्राहकाची मदत घेतली. त्या ग्राहकाकडे काही पैसे दिले. पोलिसांचे पथक त्या स्पा सेंटरजवळ गेले. कारवाईदरम्यान पोलीस त्या स्पा सेंटरच्या आत गेले. तेथे एक महिला बसली होती. बनावट ग्राहकाने स्पासह शरीरसुखाच्या मोबदल्यात 5 हजार रुपये देण्याचे ठरवले. पोलिसांनी स्पामधून काही पैसे आणि मोबाईल, इतर वस्तू जप्त केल्या आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. त्या दोन्ही महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. याप्रकरणी स्पाच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List