कॉर्ल गर्ल सेवा पुरविण्याच्या नावाने ऑनलाईन फसवणूक, राजस्थानातील भामट्याला बेड्या
कॉल गर्ल सेवा देण्याची बतावणी करत हौशी ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱया राजस्थानातील एका भामटय़ाला काळाचौकी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुह्यासाठी वापरत असलेले तीन मोबाईल, नऊ सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.
काळाचौकी येथे राहणाऱया एका तरुणाची कॉल गर्ल सेवा पुरविण्याच्या नावाखाली हजारो रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याविरोधात त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, महिला उपनिरीक्षक शीतल माने तसेच सुभाष रासवे, गणेश चव्हाण या पथकाने तपास सुरू केला.
सीडीआर, एसडीआर, आयपीडीआर आणि बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता तरुणाची ऑनलाइन फसवणूक करणाऱया तरुणाचे नाव महेंद्र पाटीदार असे असून तो राजस्थानच्या गलियाना गावचा रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने अधिक माहिती काढली असता आरोपीचे गाव हे आदिवासीबहुल असून तेथे सगळे ऑनलाइन फ्रॉड करणारेच असल्याचे समोर आले.
मग पथकाने आरोपीने ज्या एटीएममधून पैसे काढले, त्या संबंधित बँकेशी पत्र व्यवहार करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. आरोपीचा फोटो मिळाल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल नंबरचे लोकेशन मिळवले असता ते उदयपूर येथील मिळून आले. त्यामुळे पोलिसांच्या दोन्ही पथकांनी उदयपूर शहरातील एकूण 70 हॉटेल्स तपासली. हॉटेल्स तपासत असताना पाहिजे आरोपी एका ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथे जाऊन पोलिसांनी पकडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List