क्रेडिट कार्डच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक

क्रेडिट कार्डच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक

क्रेडिट कार्डच्या नावाखाली पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱयाला सायबर ठगाने चुना लावला आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार हे डॉक्टर असून ते पालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. गेल्या आठवडय़ात ते कामावर असताना त्याना मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. तिने परदेशी क्रेडिट कार्डच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच ते क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवले. ते कार्ड घेण्यासाठी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट आणि ओळखपत्र द्यावे लागेल असे त्याना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने स्टेटमेंट आणि ओळखपत्र पाठवले.

त्यानंतर त्याना आणखी दुसऱया नंबरवरून फोन आला.  त्या वेबसाईटवर जाऊन तपशील भरण्यास सांगितला. तपशील भरल्यावर 5 रुपये भरावे. मोबाईलवर आलेला ओटीपी त्या वेबसाईटवर जाऊन भरण्यास सांगितले.

त्यानुसार तक्रारदार याने तपशील आणि ओटीपी भरला. ओटीपी भरल्यावर स्क्रीनवर एररचा मेसेज आला. त्यानंतर त्याना व्हॉटस्अॅपवर व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवर समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्याने विचारणा केली. त्याचदरम्यान त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले गेले. पैसे गेल्याचा मेसेज येताच त्याने फोन कट केला. याची माहिती खासगी बँकेच्या सायबर गुन्हे तपास पथकाला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;