महिलांसोबत गैरव्यवहार करणं नाना पाटेकर यांच्यासाठी…, प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप, चाहत्यांना धक्का

महिलांसोबत गैरव्यवहार करणं नाना पाटेकर यांच्यासाठी…, प्रसिद्ध अभिनेत्रीचे गंभीर आरोप, चाहत्यांना धक्का

झगमगत्या विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्यातील वादाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. कारण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिने केलेल्या गंभीर आरोपामुळे काहीही फरक पडत नाही. मला याबद्दल काहीही माहिती नाही… असं नाना पेटकर म्हणाले. यावर आता तनुश्री हिने संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र फक्त नाना पाटेकर – तनुश्री दत्ता यांच्या वादाची चर्चा रंगली आहे.

संताप व्यक्त करत तनुश्री म्हणाली, ‘जेव्हा वाराणसी याठिकाणी एका मुलाला मारल्याचा नानांचा व्हिडीओ समोर आला. तेव्हा देखील ते खोटं बोलताना दिसले. नाना किती खोटे आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. तेव्हा अनिल शर्मा यांच्या सिनेमाचं शुटिंग नाना करत होते. नाना यांनी आधी मुलाला मारलं आणि त्यानंतर सिनेमाची शुटिंगचा सीन असल्याचं सांगत स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागू लागले…’

‘आता नाना पाटेकर पुर्णपणे घाबरले आहेत. कारण त्यांना इंडस्ट्रीमधून साईटलाईन केलं आहे. लोकांना आता दिसत आहे की, नाना कसं लोकांचे विचार बदलतात. नाना पाटेकर खोटं बोलण्यामध्ये फार हुशार आहेत. फक्त मी नाही, अनेकांनी सांगितलं आहे नाना पाटेकर चांगला माणूस नाही. वाराणसीच्या त्या मुलाने देखील सत्य सांगितलं होतं.’

पुढे तनुश्री म्हणाली, ‘नाना जर सर्वांसमोर मुलाला मारू शकतात, दिग्दर्शकाला मारहाण करु शकतात, तर एखाद्या महिलेसोबत गैरव्यवहार करणं त्यासाठी कोणती मोठी गोष्ट नाही… ‘ सांगायचं झालं तर, तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

तनुश्री हिने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं वक्तव्य

‘मला माहिती होतं सर्वकाही खोटं आहे. त्यामुळे मला कधी राग आला नाही. जेव्हा सर्वकाही खोटं आहे तर, राग कोणत्या गोष्टीसाठी करू आणि सर्व गोष्टी जुन्या झाल्या आहेत. घटलेल्या घटना आहे. त्यावर आता मी काय बोलणार? जर असं काही झालंच नाही तर, यावर मी काय बोलणार…’ असं नाना पाटेकर मुलाखतीत म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;