पुजारी टोळीशी संबंधित आरोपीला जामीन
कल्याण येथील हॉटेल मुकेशमध्ये खंडणीसाठी धमकी व गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला सात वर्षे कोठडीत राहिल्यानंतर जामीन मंजूर झाला. आरोपी अली अब्बास जाफर हा गँगस्टर रवी पुजारीच्या टोळीशी संबंधित आहे.
सात वर्षे ढिम्म राहिलेला खटला व दीर्घकाळ कोठडीच्या आधारे उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. अली जाफरने अॅड. शुभम काहीटे व अॅड. अभिषेक येंडे यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अॅड. काहीटे यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी आरोपी जाफरला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List