पक्ष्याच्या एका पिसासाठी मोजले 23 लाख रुपये
न्यूझीलंड येथील एका पक्ष्याचे पीस 46 हजार 521 डॉलर म्हणजे साधारण 23 लाख रुपयांना विकले गेले. हुइया नावाच्या पक्ष्याचे हे पीस आहे. 100 वर्षांपूवी या पक्ष्याची प्रजाती नष्ट झाली होती. त्यामुळे अत्यंत दुर्मीळ अशा हुइया पक्ष्याच्या पिसाला लिलावात मोठी बोली लागली. पिसाचे वजन 9 ग्रॅम आहे. सोन्यापेक्षाही कित्येक पट अधिक भाव एका पिसाला मिळाला आहे.
हुइया पक्ष्याचे शेवटचे दर्शन 1907 साली झाले होत़े असेही मानले जाते की, 1920 च्या दरम्यान हुइया पक्षी दिसला होता. वेब्स ऑक्शन हाऊसच्या डेकोरेटिव्ह आर्टस्च्या प्रमुख लिह मॉरिस यांच्या माहितीनुसार, या पिसाची चमक खूप चांगली आहे. किडय़ांपासून त्याचे नुकसान झालेले नाही. पिसाचे संवर्धन करण्यासाठी त्याला अका&ईव्हल पेपरसह युव्ही प्रोटेक्टिव काचेच्या मागे ठेवले होते. एका खासगी संग्रहात असलेले हे पंख पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात.
कशासाठी महाग…
हुइया हा न्यूझीलंडच्या विशिष्ट वॅटलबर्ड वर्गातील गाणारा लहान पक्षी म्हणून ओळखला जातो. न्यूझीलंडमधील माओरी लोक याला पवित्र पक्षी मानतात. त्याची पिसे या लोकांचे टोळीप्रमुख आणि त्यांचे कुटुंबीय मुकुटात परिधान करत होते. भेटवस्तू किंवा व्यापारासाठीही त्याचा वापर केला जात होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List