विजय माल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदी वऱ्हाडी
हिंदुस्थानातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याचा विवाह लंडनमध्ये थाटामाटात पार पडला. सिद्धार्थने त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिनसोबत विवाह केला आहे. या विवाहाला अनेक जण उपस्थित होते. परंतु सध्या सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.
बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणारा ललित मोदी या विवाह सोहळय़ाला उपस्थित होता. ललित मोदीविरोधात टॅक्स फसवणूक, मनी लॉण्डरिंगसारखी प्रकरणे सुरू आहेत. विजय माल्यावरही बँकांचे फ्रॉड केल्याचे आरोप आहेत. आयपीएलच्या गव्हार्ंनग काऊंसिलचे अध्यक्ष असताना 753 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जॅस्मिनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List