पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश! राम मंदिरातील गळतीवरून शिवसेनेची टीका

पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश! राम मंदिरातील गळतीवरून शिवसेनेची टीका

निवडणूकीत राम मंदिराचा फायदा व्हावा यासाठी केंद्रातील भाजप सरकारने अपूर्ण बांधकाम असलेल्या राम मंदिराचे घाईघाईत उद्घाटन केले होते. दरम्यान या मंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पहिल्या पावसातच हे मंदिर गळू लागले आहे. रामलल्ला विराजमान असलेल्या गाभाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी झिरपू लागल्याची तक्रार मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच केली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

यंदा पावसाळा सुरू झाला आणि मोदी सरकारच्या कामाची पोलखोल झाली. मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी घाईघाईत अपूर्ण बांधकाम असलेल्या राम मंदिर व कोस्टल रोडचे उद्घाटन केले. त्यामुळे पहिल्याच पावसात या ठिकाणी गळती सुरू झाली आहे. सोबतच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला देखील भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले आहे.

शिवसेनेकडून X या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्या माध्यमातून मोदी सरकावर टीका केली आहे. ”पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश. निवडणुकीमुळे मोदींना पूर्ण न झालेल्या कामांच्या उदघाटनांची एवढी घाई लागली होती की, त्या घाईचे परिणाम आता जनतेला भोगावे लागतायत. विकासाच्या नावाखाली फक्त जनतेचा पैसा उधळला गेला, पण पुढे निष्पन्न काहीच झालं नाही, अशी टीका या व्हिडीओतून करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;