फर्ग्युसनजवळील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी भोवली; आठ जण अटकेत

फर्ग्युसनजवळील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी भोवली; आठ जण अटकेत

फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रग्जची पार्टी आयोजित करणे मूळ हॉटेल मालकासह 8 जणांना भोवली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. तर कामामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन बीट मार्शल यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, सोमवारी (दि. 24) दुपारच्या सुमारास पतित पावन संघटनेने घोषणाबाजी करीत हॉटेलची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

संतोष कामठे, सचिन कामठे, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, मॅनेजर मानस मलिक, आयोजक रोहन गायकवाड, अक्षय कामठे, डीजे चालक दिनेश मानकर यांना अटक केली आहे. तर पोलीस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित केले आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला निलंबित केले आहे.

लिक्विड लेजर लाऊंज हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही मुले ड्रग्ज आणि दारूचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. पार्टीमध्ये काही तरुण दारूसह ड्रग्ज घेताना आढळून आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

झोन-1 च्या पोलीस उपायुक्तांचे दुर्लक्ष

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांनी नियमानुसार व्यवसाय करण्याचे सूचित केले होते. मात्र, अवघ्या महिन्याभरातच मध्यवर्ती एफसी रस्त्यावरील हॉटेलमध्ये अमली पदार्थांचा धूर निघाल्याचे दिसून आले. त्यामुळे याकडे झोन-1 चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांचे लक्ष नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पबमध्ये अल्पवयीन मुले? तिघांनी रात्रीत उडवले 85 हजार

लिक्विड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री पबमधील प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करणाऱया तरुणांचा शोध सुरू केला आहे. त्या तरुणांनी 80 ते 85 हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. पबमध्ये काही अल्पवयीन मुले असण्याची शक्यता आहे. त्या रात्री पबमध्ये असलेल्या 40 ते 45 तरुणांची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण मध्यरात्री पाठीमागील दरवाजाने पबमध्ये शिरले. पबमध्ये येण्यापूर्वी त्यांनी ‘पार्टी’ केल्याची माहिती मिळाली आहे.

पतित पावन संघटनेकडून हॉटेलची तोडफोड

हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांसह इतर तरुणांना ड्रग्जची पार्टी आयोजित केल्याप्रकरणी पतित पावन संघटना आक्रमक झाली. सोमवारी दुपारच्या सुमारास संघटनेने लिक्विड लेजर लाऊंज हॉटेलची तोडफोड केली. 8 ते 10 जणांनी हॉटेलबाहेरील संपूर्ण सजावट तोडून टाकत घोषणाबाजी केली. संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दांडक्याने हॉटेलचा बोर्ड, फुलदाणी, कुंडय़ा, डेकोरेशनची तोडफोड करून प्रचंड नुकसान केले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;