18 लाख उद्योग बंद पडल्याने 54 लाख लोक बेरोजगार; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात बेरोजगारी प्रचंड वाढली

18 लाख उद्योग बंद पडल्याने 54 लाख लोक बेरोजगार; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात बेरोजगारी प्रचंड वाढली

हिंदुस्थानात जुलै 2015 ते जून 2016 आणि ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील 18 लाख असंघटित उद्योग बंद झाले. या कालावधीत या असंघटित उद्योगांमध्ये काम करणाऱया 54 लाख लोकांच्या नोकऱया गेल्या. ही धक्कादायक आकडेवारी असंघटित क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) 2015-16 मध्ये  केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलीय.

ऑक्टोबर 2022 ते सष्टेंबर 2023 दरम्यान उत्पादन क्षेत्रात सुमारे 178.2 लाख असंघटित उद्योग सक्रिय होते. जुलै 2015 ते  जून 2016 दरम्यान कार्यरत असलेल्या 197 लाख असंघटित उद्योगांच्या तुलनेत सुमारे 9.3 टक्के कमी आहे. तसेच या उद्योगांमध्ये काम करणाऱया लोकांची संख्याही या कालावधीत 15 टक्क्यांनी कमी होऊन 3.06 कोटी झाली, जी आधी 3.604 कोटी रुपये होती.

 सांख्यिकी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रणव सेन म्हणाले, असंघटित  क्षेत्राला सततच्या मोठय़ा आर्थिक धक्क्यांचा फटका बसला आहे.  अशा धक्क्यांमध्ये वस्तू आणि सेवा कर, कोविड महामारी आहे. प्रणव सेन पुढे म्हणाले, या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि साथीच्या आजारामुळे असंघटित क्षेत्रावर वाईट परिणाम झाला यात शंका नाही. या क्षेत्रातील उद्योगांतून साधारणपणे 2.5 ते 3 लोकांना रोजगार मिळतो. बहुतेक लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत किंवा त्यांच्यामध्ये कुटुंबातील सदस्य काम करतात. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील 54 लाख नोकऱया गेल्या आहेत.

असंघटित क्षेत्रातील उद्योगांमध्ये साधारणपणे लहान व्यवसाय, एका व्यक्तीची मालकी, भागीदारी आणि अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असतो.

ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत ट्रेडिंग क्षेत्रातील असंघटित उद्योगांची संख्या 2 टक्क्यांनी कमी होऊन 2.25 कोटी झाली. जुलै 2015 ते जून 2016 या कालावधीत ती 2.305 कोटी होती. या काळात या क्षेत्रातील कामगारांची संख्या नगण्य वाढली असून 3.87 कोटींवरून 3.90 कोटी झाली आहे.

या काळात इतर सेवा क्षेत्रांतील असंघटित उद्योगांची संख्या सुमारे 19 टक्क्यांनी वाढून 2.464 कोटी झाली, जी याआधी 2.068 कोटी होती. त्याच वेळी या क्षेत्रात काम करणाऱया कामगारांची संख्या  3.65 कोटींवरून 9.5 टक्क्यांनी वाढून 3.996 कोटी झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;