केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रिम कोर्टात उद्यापर्यंत स्थगिती

केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रिम कोर्टात उद्यापर्यंत स्थगिती

विशेष न्यायालयाने दिलेल्या जामिनाला अंतिम निकालापर्यंत स्थगिती देणाऱया दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशांविरुद्ध दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर आज कोणताही आदेश देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचे आदेश येईपर्यंत थांबण्याची भूमिका घेत सुनावणीला 26 जूनपर्यंत स्थगिती दिली. हायकोर्ट उद्या या प्रकरणी आपला निकाल देणार आहे.

मात्र, केजरीवाल यांच्या जामिनाविरुद्ध ईडीने मागितलेल्या स्थगितीवर आदेश राखून ठेवण्याचा हायकोर्टाचा दृष्टिकोन ‘काहीसा असाधारण’ असल्याची टिपणी खंडपीठाने केली. सर्वसाधारणपणे स्थगिती अर्जांवर आदेश राखून ठेवले जात नाहीत. ते सुनावणीच्या वेळीस तेव्हाच दिले जातात. यामुळे निर्देश राखून ठेवणे हे काहीसे असाधारण आहे, असे मत न्या. मनोज मिश्रा आणि न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

हायकोर्टात आज फैसला
केजरीवाल यांना जामीन देण्याविरुद्ध ईडीने केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय उद्या मंगळवारी निकाल देणार आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन दुपारी 2.30 वाजता आपला निकाल सुनावतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;