कॉम्पुटरवर आधारित परीक्षांची जबाबदारी एनआरएवर; परीक्षा कायद्याची नियमावली जाहीर

कॉम्पुटरवर आधारित परीक्षांची जबाबदारी एनआरएवर; परीक्षा कायद्याची नियमावली जाहीर

 

केंद्र सरकारने आज सार्वजनिक परीक्षा कायद्याची नियमावली जाहीर केली. त्यानुसार देशभरातील कॉम्प्युटरवर आधारित परीक्षांची जबाबदारी नॅशनल रीक्रुटींग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय भर्ती संस्थेवर सोपविण्यात आली आहे. कॉम्प्युटरवर आधारित सर्व परीक्षांसाठी नियम, श्रेणी आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची जबाबदारीही एनआरएकडे देण्यात आली आहे. सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 लागू झाल्यानंतर काही दिवसांच्या आतच केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली.

विविध सार्वजनिक संस्थांच्या वतीने आयोजित परीक्षेतील घोटाळे रोखण्यासाठी केंद्र सरकारने अशाप्रकारचा पहिला कायदा तयार केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वजनिक परीक्षा विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर याबाबत कायदा तयार करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;