फुलक्रुगने जर्मनीचा श्वास रोखला, स्टॉपेज वेळेत गोल ठोकत स्विसशी साधली बरोबरी

फुलक्रुगने जर्मनीचा श्वास रोखला, स्टॉपेज वेळेत गोल ठोकत स्विसशी साधली बरोबरी

 यजमान जर्मनीने सलग दोन विजयांसह आधीच बाद फेरी गाठली होती, पण अखेरच्या साखळी लढतीत स्वित्झर्लंडने त्यांना जवळजवळ धक्का दिलाच होता. सामना काही सेपंदांत 1-0 असा स्विसच्या पारडय़ात जाणार होता आणि तेव्हाच जर्मन स्ट्रायकर निकलास फुलक्रुगने स्टॉपेज वेळेत गोल करत सर्वांना श्वास रोखायला लावला. सामना 1-1 असा बरोबरीत सोडवत जर्मनीने युरो चषक स्पर्धेच्या ‘अ’ गटातील आपले अव्वल स्थान कायम राखले.

स्विस फॉरवर्ड डॅन एनडोयोने आज जर्मनीची पार्टी खराब करण्याचा पूर्ण प्लॅनच आखला होता. सामन्याच्या 28व्या मिनिटाला रेमो प्रुएलरच्या पासवर एनडोयोने जर्मनीच्या गोलरक्षकाला भेदत संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर पूर्ण सामन्यात स्विस बचावफळीने यजमानांना गोलपोस्टच्या आसपासही फिरकू दिले नाही.

सामना बरोबरीत सोडवण्यासाठी जर्मनीच्या आक्रमकांनी जंग जंग पछाडले, पण स्विसच्या बचावफळीने त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. जर्मन खेळाडूंना गोल करण्याची अनेकदा संधी मिळाली, पण ते त्या संधीचे सोने करण्यात वारंवार चुकले. त्यातच रेफ्रींनीही त्यांच्या काही पेनल्टी नाकारल्या होत्या. त्यामुळे जर्मन खेळाडू अक्षरशः वैतागले होते. पराभव त्यांच्यासमोर तोंड उघडून बसला होता. कोणत्याही क्षणी जर्मनीला ते गिळणार होते. अखेर 18 व्या प्रयत्नात जर्मनी आपला पहिला गोल करण्यात यशस्वी ठरली. रऊमच्या पासला फुलक्रुगने हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये धाडले आणि पराभवाच्या उंबरठय़ावर असलेल्या जर्मनीने सामना बरोबरीत सोडवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;