बीडीडी चाळींतील 550 कुटुंबांचं नवं वर्ष नव्या घरात; डिसेंबरमध्ये होणार गृहप्रवेश

बीडीडी चाळींतील 550 कुटुंबांचं नवं वर्ष नव्या घरात; डिसेंबरमध्ये होणार गृहप्रवेश

पिढय़ान्पिढय़ा 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या बीडीडीवासियांचे 500 चौरस फुटांच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून दोन इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरमध्ये सुमारे 550 रहिवाशांचे नवीन इमारतीत स्थलांतर केले जाईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले. सद्यस्थितीत वरळी, नायगाव व ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामुळे रहिवाशांना 500 फुटांचे प्रशस्त घर विनामूल्य मिळणार आहे. मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन पंपनीमार्फत वरळी बीडीडीतील 54 एकर जागेवरील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहेत. सध्या पुनर्वसन इमारत क्रमांक-1मधील 8 विंगचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी डी आणि ई विंगचे 40 मजले पूर्ण झाले आहेत. सहा विंगचे संरचनात्मक काम विविध मजल्यांपर्यंत पोहोचले आहे.

उच्च दर्जाच्या सुविधा

रहिवाशांना व्हिट्रीफाईड टाईल्सचे फ्लोरिंग, किचन आणि टॉयलेटमध्ये ऑण्टिस्किड टाईल्स, सिंकसहित ग्रॅनाईट किचन ओटा, खिडक्यांना अॅनोडाईड सेक्शन, टॉयलेटसाठी मार्बलची फ्रेम असलेले दरवाजे अशा उच्च दर्जाच्या सोयीसुविधा मिळणार आहेत.

अकरा महिन्यांचे एकत्रित भाडे मिळणार

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दुसऱ्या टप्प्यातही 11 महिन्यांचे भाडे एकत्रित मिळणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत चाळीतील पात्र रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देण्यात येतात. ज्यांनी संक्रमण शिबिराचा पर्याय स्वीकारला नाही, अशा रहिवाशांना दरमहा पंचवीस हजार रुपये भाडे म्हाडा देते. सुरुवातीला 11 महिन्यांचे भाडे म्हाडाने एकत्रित दिले होते. मात्र रहिवाशांना यापुढे एकत्रित भाडे न देता दरमहा देण्यात येईल, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्याबाबत राज्य सरकारने खुलासा करून रहिवाशांमधील संभ्रम दूर करावेत, अशी मागणी नुकतीच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती.

फ्लॅटसोबत स्वतंत्र पार्किंग

वरळी बीडीडी चाळींतील रहिवाशांना प्रत्येक फ्लॅटसोबत स्वतंत्र पार्किंग मिळणार असून यासंदर्भातला प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. ही मागणी मान्य झाल्यास सध्याचे सहा मजली पोडियम आठ मजल्यांचे केले जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;