बांबूच्या झोळीत महिलेची प्रसूती; नंदुरबारमधील धक्कादायक घटना

बांबूच्या झोळीत महिलेची प्रसूती; नंदुरबारमधील धक्कादायक घटना

महिलांसाठी स्टँड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला कॉयर विकास योजना, महिला समृद्धी योजना अशा विविध योजना आणणाऱ्या मोदी सरकारच्या काळात आदिवासी पाडय़ांमधील महिला दुर्लक्षितच राहिल्याचे समोर आले आहे. एका आदिवासी महिलेला बांबूच्या झोळीत प्रसूतीसाठी घेऊन जाताना तिची प्रसूती रस्त्यातच झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबारच्या धडगांव येथे घडली. गावातून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने कडेकपाऱ्या तुडवत गावकऱ्यांना रुग्णालय गाठावे लागते. स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही आदिवासी पाडय़ांची अशी अवस्था आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून हीच का मोदींची गॅरंटी, असा सवाल आदिवासी बांधवांकडून केला जात आहे.

अल्का आकाश पावरा असे या महिलेचे नाव आहे. सध्या तिच्यावर आणि नवजात बाळावर नंदुरबारमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांना दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि गावात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिलांची रस्त्यातच प्रसूती होत असल्याचे चित्र आहे.

पावसाळय़ात पाडय़ाचा संपर्क तुटतो

वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत, तर अनेकदा रस्त्यातच प्रसूती होत असल्याच्याही घटना घडल्या आहेत; परंतु प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. 100 हून अधिक लोकसंख्या असलेल्या या पाडय़ाचा जिह्याशी, इतर गावांशी पावसाळय़ात पूर्णपणे संपर्क तुटतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;