बेकायदा पार्किंग वाहने उचलण्याचा भार पालिकेवर, वाहतूक पोलिसांना हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन पुरवणार

बेकायदा पार्किंग वाहने उचलण्याचा भार पालिकेवर, वाहतूक पोलिसांना हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन पुरवणार

मुंबईमध्ये बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली दुचाकी-चारचाकी वाहने उचलण्याचा भार आता मुंबई महानगरपालिकेच्या माथी पडणार आहे. यामध्ये पालिका वाहतूक पोलिसांना हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सची सेवा पुरवणार आहे. यासाठी पालिका सुमारे 11 कोटींचा खर्च करणार असून याचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे या विभागांत बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना खेचून आणण्यासाठी 36 नग हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सची सेवा पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. हे करार एप्रिल 2024 मध्ये संपुष्टात आल्यानंतर आता आणखी दोन वर्षांसाठी नवीन करार करण्यात आला आहे. ही सेवा भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही सेवा घेण्यात आली आहे. यासाठी जय मल्हार हायरिंग सर्व्हिसेस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या टोव्हिंग व्हॅनच्या आधारे वाहतूक पोलीस हे रस्त्यावरील बेकायदा वाहने उचलून नेत संबंधित वाहनचालकांकडून दंडाची रक्कम वसूल करणार असून ही दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे, पण यासाठीच्या वाहनांच्या सुविधांसाठी महापालिकेच्या तिजोरीत हात घातला जात आहे.

या भागांत होणार कारवाई

वाहनतळाच्या तसेच रेल्वे स्थानकाच्या 500 मीटर परिक्षेत्रात रस्त्यावर बेकायदेशीपणे उभ्या केलेल्या 9 दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवरही कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः मुंबईतील एम. के. रोड, एस.व्ही. रोड, एल.बी.एस. रोड व न्यू लिंक रोड या चार मुख्य रस्त्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;