कोकण रेल्वेसाठी ‘पॅच डबलिंग’चा पर्याय

कोकण रेल्वेसाठी ‘पॅच डबलिंग’चा पर्याय

कोकण मार्गावरील रेल्वे हाऊसफुल्ल धावत असल्याने जादा स्पेशल गाडय़ा चालवण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी होते. मात्र एकेरी रेल्वे रुळामुळे रेल्वे गाडय़ा चालवणे शक्य होत नाही. या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यामध्ये नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’चा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. तसा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला पाठवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रस्तावास हिरवा पंदील मिळाल्यास कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी होऊन नवीन जादा स्पेशल चालवणे शक्य होईल.

१‘पॅच डबलिंग’मुळे संपूर्ण मार्ग दुपरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे, त्या भागातच दुहेरीकरण केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यांतून व पुलावरून जात आहे. हे बोगदे व पूल एकेरी रुळांसाठी बांधले आहेत. मार्गाचे दुपरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे त्या ठिकाणी रुंदीकरण करावे लागणार असून नवीन पुलांची उभारणी करावी लागणार आहे. या बाबी खर्चिक त्यामुळे सद्यस्थितीत ‘पॅच डबलिंग’ करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;